स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर स्वत:चा विश्वास पाहिजे. भले तुम्ही इतरांसाठी कितीही आत्मविश्वासरहित किंवा दोषपूर्ण असा. स्वत: जीवन जगताना संकटे ही येताच असतात. त्याना तुम्ही धीराने सामोरे गेले पाहिजे. एखादा फिनिक्स पक्षी जसा आगीमध्ये पूर्ण जलुनसुद्धा तो राखेतून उठून भरारी घेतो. त्याप्रमाणे मनुष्याने स्वत:वर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. जग हे दोन्ही बाजूने बोलत असते. त्यासाठी जगाचे बोलने अपन मनावर न घेता आपल्याला जे योग्य वाटते, तेच अपन केले पाहिजे. कारण जग हे आपल्याला संकटात कधीही मदत करत नसते. म्हणून माणसाने जगाचा विचार न करता स्वत: स्वत:च्या विचाराने वाटचाल केली पाहिजे.
त्यासाठी खडतर परिस्थितीमध्येही झगडून आयुष्य व्यतीत करणारा माझा मित्र किंवा मैत्रिण हे सर्वजन माझे सखे सोबती आहेत. त्यासाठी तुम्हा सर्व मित्र मैत्रिणी याना माझ्या हार्दिक शुभेच्छा !