|
नारायण गंगाराम सुर्वे |
माझे
विद्यापीठ
ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी
पायाखालची जमीन होती,
दुकानांचे आडोसे
होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.
अशा देण्यात आलेल्या
उठवळ आयुष्याची उठबस करता करता..
टोपलाखाली माझ्यासह
जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.
मोजलेत सर्व खांब
ह्या रस्त्यांचे, वाचली पाठ्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या
वजाबाकीत पाहिलेतच हातचे राखून कित्येक मारलेले गडी.
हे जातीजातींचे
बाटलेले वाडे, वस्त्य, दारावरचे तांबडे नंबरी
दिवे
सायंकाळी मध्यभागी
असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.
अशा तांबलेल्या, भाकरीसाठी
करपलेल्या, उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते, घोडे लोळण
घेत होते, उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.
''ले, पकड रस्सी- हां- खेच, डरता है? क्या
बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन; पकड घोडे कोच
हांच यह, वाह रे मेरे छोटे नालवाले.''
याकुब नालबंदवाला
हसे,
गडगडे.
पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
''अपनेको कालाकांडी, तेरेको जलेबी
खा.टट म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.
याकुब मेला दंग्यात, नव्हते नाते; तरीही माझ्या
डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले प्रेत तेव्हा, टमिलाद-
कलमाटच्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.
त्याच दिवशी मनाच्या
एका कोऱ्या पानावर लिहिले, टटहे नारायणा
अशा नंग्यांच्या
दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा.''
भेटला हरेक रंगात
माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन
रटरटत्या उन्हाच्या
डांबरी तव्यावर घेतलेत, पायाचे तळवे होरपळून.
करी का होण जाणे!
माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलांच नाही
आयुष्य पोथीची उलटली
सदतीस पाने; वाटते अजून काही पाहिलेच नाही.
नाही सापडला खरा
माणूस , मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो?
सदतीस जिने चढून
उतरताना, मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो?
आयुष्य दिसायलां
पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस, गुटगुटीत बाळसेदार.
आत: खाटकाने हारीने
मांडवीत सोललेली धडे, असे ओळीवर टांगलेले उच्चार
जीवनाचा अर्थ दरेक
सांगीत मिटवीत जातो स्वत:ला स्वत:च्याच कोशात
पेन्शनरासारखा
स्तृमी उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत
हे सगळे पाहून आजही
वाटते, ''हे नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो.'
चुकचुकतो कधी जीव; वाटते, ह्या
युगाच्या हातून नाहकच मारलो गेलो.
थोडासा रैक्ताला
हुकुम करायचा होता, का आवरला म्यानावरचा हात,
का नाही घेतले
झोकवून स्वत:ला, जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.
विचार करतो
गतगोष्टींचा, काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उद्ध्वस्त नगरात
काहीसे हरवलेले शाधीत हिंडावा परतलेला सैनिक.
किती वाचलेत चेहरे, किती
अक्षरांचा अर्थ उतरलां मनात
इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार
ग्रंथराज कोलमडून कोसळतात.
खूप सोयरीक करतो आता
ग्रंथांची, वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे
परिचारिकेसम, कांगारासन निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.
जगताना फक्त
थोड्याशाच शब्दांवर निभावते; मरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून
पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.
वाढले म्हणतात पृथ्वीचे
वय,
संस्कृतीचेही; परत वयेच
वाढत गेली सर्वांची
छान झाले; आम्हीही
वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळाऱ्यांची.
ह्या कथाः कढ
आलेल्या भाताने अलगत झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणाऱ्या
अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करून सोडतात.
कळले नाहीः तेंव्हा
याकूब का मेला? का मणामणाच्या खोड्यात आफ्रीकन कोंडला?
का चंद्राच्या
पुढ्यातला एकुलता पोर युद्धाच्या गिधाडाने अल्लद उचलला?
चंद्रा नायकीण; शेजारीण? केसांत
कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या
केसांवरून कापसाखळीची सोनसरी झुलपावरून झुलणारी
अनपढ. रोजचं विकत
घेई पेपर? रोजचं कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
''खडे आसा रे माझो झील, ह्या मेरेर
का त्या रे,'' भक्तिभावाने विचारीत जाई.
कितीतरी नकाशांचे
कपटे कापून ठेवले होते तिने, जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची
स्टेशनांच्या फलाटावरून, बराकीवरून, मलाच कुशीत ओढी जवळ.
मेली ती; अश्रूंचे दगड
झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या
पायरीवर जाऊन, जसे ऊन. उठताना उठवत नाहीत नाती तोडून.
निळ्या छताखाली
नांगरून ठेवल्या होत्या साह्येबांच्या बोटी
दुखत होत्या
खलाशांच्या माल चढवून उतरून पाठी.
वरून शिव्यांच्या
कचकोल उडे, ''सुव्वर, इंडियन, काले
कुत्ते.टट
हसताहसता रुंद होत
गोऱ्या मडमांच्या तोंडाचे खलबत्ते
आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे, ''काम नही
करेगा.
चिलमीवर काडी पेटवीत
मी विचारी, ''चाचा, पेट कैसा भरेगा?''
धुसफुसे तो, पोटऱ्या ताठ
होत,
भराभरा
भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले; त्याच्या
डोळ्यांत पेटले विद्रोहाचे पाणी
टरकावले घामेजले
खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच ध्येय
माझा गुरू पहिले वाक्य बोलला,
''हमारा खून झिंदाबाद!'' वाटले, चाचाने उलथलाच
पृथ्वीगोल
खळाळल्या नसानसांत
लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल
अडकवून साखळदंडात
सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
''बेटा!'' गदगदला कंठ. एक अश्रू
खमीसावर तुटून पडला.
कुठे असेल माझा गुरू, कोणत्या
खंदकात, का? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन
चाचाचा पाठीवरून फिरलेला हात
आता आलोच आहे जगात, वावरतो आहे
ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे, आपलेसे
करायलाच हवे, कधी दोन घेत, कधी दोन देत.
- नारायण सुर्वे