खूप दिवसांनी सलग दोन दिवस सुट्टी मिळाल्याने ती आणि तो महाबळेश्वरला फिरायला गेले होते. दिवसभर दोघांनीही खूप धमाल केली. मक्याची गरम कणसे खाल्ली, घोड्यावर बसले. सुट्टी असल्याने प्रवासी जोडप्यांची चांगलीच गर्दी होती. संध्याकाळ होऊ लागली, तसे सर्वजण 'सनसेट' पाईंटकडे मोक्याची जागा पकडण्यासाठी जाऊ लागले. ही दोघंही चालत चालतंच तिकडे गेली आणि वेळेवर तिथे पोहोचली.
दूरवर दिसणा-या डोंगररांगा आणि त्याच्या पाठीमागे लपण्यासाठी चाललेला तो सोन्याचा गोळा. ती त्या दृश्यामध्ये पूर्ण हरवून गेली. 'किती सुंदर.... मला इथेच कायमचं रहावसं वाटतंय.' निसर्गाच्या त्या रमणीय दर्शनाने ती वेडावून गेली होती. त्याचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता आणि शाळेत पाठ केलेली बालकवीची निसर्ग कविता ती त्याला ऐकवत होती. मावळत्या सूर्याने डोंगर शिखराला स्पर्श केला आणि तो हळूहळू खाली जाऊ लागला. त्या अद्भुत दृश्याचा आनंद 'तो' ही घेत आहे ना हे पाहण्यासाठी तिने त्याच्याकडे पाहिले आणि तिचा चांगलाच हिरमोड झाला. त्याचे तिच्या कवितेकडे आणि समोरच्या सूर्याकडेही अजिबात लक्ष नव्हते.

सूर्यास्त पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतल्या तरुण चंद्रीकाना पाहण्यात 'तो' पूर्णपणे तल्लीन झाला होता. तिने त्याला ढोसले, "अरे लक्ष कुठे आहे तुझं ?" तो पटकन त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. "अगं हे काय, सुर्यास्तच पाहतो आहे मी. किती सुंदर आहे नाही ?" "कोण ?" तिनं फणका-यानेच विचारले.
असे का घडते ?
ब-याच पुरुषांची नजर स्त्री सौंदर्याचा नकळत वेध घेत असते. सुंदर स्त्रियांनाही त्याची जाणीव असते आणि त्यांना अशा नजरा खेचून घेणे आवडतेही ! मुलगा वयात येऊ लागला कि त्याला सुंदर मुलींना न्याहाळावे असे वाटू लागते. हा त्याच्या शरीरातील वाढत्या 'टेस्टेस्टेरॉन' या लैंगिक हार्मोनसचा परिणाम असतो आणि हा परिणाम वार्धक्य आले तरी कायम टिकून राहतो. स्त्रियांना मात्र एखाद्या पुरुषाचे शारीरिक सौंदर्य निरखून पाहावे, असे फारसे वाटत नाही. त्या त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे कटाक्ष टाकतात; पण ते तिरपे आणि चोरटे ! त्यामुळेच दोन अनोळखी जोडपी रस्त्यावरून एकमेकासमोरून चालत गेली, तर एका जोडप्यातील दोघांचीही नजर दुस-या जोडप्यातील स्त्रीकडेच जाते. एक स्त्री दुस-या स्त्रीकडे इतकी निरखून पाहते कि तेवढे पुण्यातले पेन्शनरही पाहत नाहीत, हा पुलंचा विनोद सूक्ष्म निरीक्षणावरच आधारलेला आहे. 'ती' दुस-या स्त्रीकडे पाहते; पण तिचं सौंदर्य पाहण्यासाठी नाही. तर तिची साडी किंवा ड्रेस पाहण्यासाठी. त्याच्या दृष्टीने मात्र निसर्गाचा सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे तरुण स्त्री. त्यातील वैविध्य पाहण्यात तो गुंग होतो. या पाहण्यात वासना किंवा अभिलाषा असेलच असे नाही. तिला मावळता सूर्य दिसतो तशा त्याला तरुण चंद्रिका अधिक सुंदर वाटतात इतकेच !

No comments:
Post a Comment